यवतमाळ येथील मारेगावजवळ ट्रक आणि मॅक्स गाडीचा भीषण अपघात, नववधूसह 3 जण ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 एप्रिल 2019

मारेगाव (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ ट्रक आणि मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात असताना मारेगाव पासून एक किमी अंतरावर तुळशीराम रेस्टॉरंटजवळ हा अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर एक महिला जी नववधू होती तिला उपचारासाठी नागपूरला नेताना मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार हिंगोली जिल्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महांकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असताना मारेगाव येथील तुळशीराम रेस्टॉरंट जवळ यवतमाळ कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने टाटा मॅक्स (MH 34 K 2438) गाडीला जोरदार धडक दिली. यात टाटा मॅक्स गाडी रोड वरुन तीन पलटी खात रस्त्याच्या बाजूला गेली. हा अपघात इतका भीषण होता की यात 2  जण जागीच ठार झाले, तर 6 जण जखमी झाले.                     

जखमींमध्ये लक्ष्मीबाई भारत उपरे (वय 60), सानिका किसन गोपाळे (वय 20) वर्ष यांचा जागीच तर साक्षी देविदास उपरे (नववधु, वय 18) यांना उपचारासाठी नागपूरला हलवताना मृत्यू झाला. जखमी मध्ये राजनंदिनी सुनिल पवार (वय 4), साधना कोंडबा गोंधरे (वय 35), पूजा शंकर उपरे (वय 20), चंपाबाई बाबा पेंडलेवार (वय 70). जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहे.

Web Title: major accident at Maregaon in Yawatmal 3 dies and 5 injured

संबंधित बातम्या

Saam TV Live