यवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

यवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झालीय. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष मदन येरावार, संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे, मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उद्घाटक वैशाली येडे आदी मान्यवर उपस्थित संमेलनस्थळी उपस्थित आहेत. 

संमेलनात कविकट्टा, चर्चासत्र, परिसंवाद, वऱ्हाडी कविता, टॉक शो, काव्यवाचन, असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतील. साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. यात ग्रंथांच्या पालखीसह विविध संतदर्शन देखावे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर यांच्या जीवनदर्शनावरील देखावे, लेंगी नृत्य, गोंडी नृत्य, कोलामी नृत्य, अशा लोकसंस्कृतीवर समूहाचे सादरीकरण झालं.

तीनशे स्वयंसेवक सज्ज
तब्बल 45 वर्षांनंतर यवतमाळात होणारे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी 300 स्वयंसेवकांचे हात राबत आहेत. सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय आणि प्रतिसाद फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांचा यात समावेश आहे. पाहुण्यांची विनम्रपणे मदत, शिस्तपालन, गैरसोय होणार नाही, याची काळजी स्वयंसेवक घेणार आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live