येडियुरप्पांना उद्या 4 पर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार - सुप्रीम कोर्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 मे 2018

कर्नाटकमधील सत्तासंघर्षावरुन सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शनिवारी बहुमत सिद्ध करणे हाच उत्तम तोडगा असल्याचे सांगत उद्या चार वाजता बहूमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 104 आमदार संख्या असलेल्या मुख्यमंत्री येडियुरप्पांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. शनिवारी संध्याकाळी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी घ्यावी, असे कोर्टाने सांगितले.

कर्नाटकमधील सत्तासंघर्षावरुन सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शनिवारी बहुमत सिद्ध करणे हाच उत्तम तोडगा असल्याचे सांगत उद्या चार वाजता बहूमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 104 आमदार संख्या असलेल्या मुख्यमंत्री येडियुरप्पांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. शनिवारी संध्याकाळी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी घ्यावी, असे कोर्टाने सांगितले. येडियुरप्पा सरकारने बहुमत चाचणीपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. तसेच पोलीस महासंचालकानी बहुमत चाचणीच्या वेळी विधीमंडळाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवावा, असेही कोर्टाने सांगितले. बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, ही भाजपाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. जोपर्यंत बहुमत सिद्ध होत नाही तोपर्यंत सर्व आमदारांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live