योगासने जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा- पंतप्रधान मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

२०१५ पासून जगात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी रोज एक आसन कशा पद्धतीने करायचे याची माहिती ऍनिमिटेड पद्धतीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून देत होते.

योगदिनानिमित्त नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगासने केली. या कार्यक्रमाला योगगुरू रामदेव बाबा हे उपस्थित होते. योगविद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविल्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले. योगविद्या हा भारताचा पुरातन ठेवा आहे, असेही त्यांनी सांगितले.

योगासने जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा, अशी इच्छा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर योगविद्या आता ग्रामीण भागात गावागावांत घेऊन जाण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Yoga should be an integral part of lifestyle - Prime Minister Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live