धक्कादायक! तुम्ही खाताय टॉयलेटमधली भाजी!

तुषार रूपनवर
बुधवार, 25 डिसेंबर 2019

तुमच्या ताटात वाढलेली तुमची आवडती भाजी कुठून आलीय, हे तपासून पाहिलंय का कधी? नसेल, तर यापुढे या भाजीचा प्रवास तपासून घ्या. कदाचित ही भाजी टॉयलेटमधून आलेली असू शकते. कारण असाच एक प्रकार घडलाय. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्वाचं आहे. काय घडलाय नेमका प्रकार पाहुयात या सविस्तर विश्लेषणातून...

मुंबई म्हणजेच मायानगरी! या शहरात सर्वच गोष्टींची भेसळ होते असं म्हटलं जातं. आतापर्यंत मुंबईत नाल्याच्या पाण्यातून भाजीपाला पिकवण्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. पण हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेत तर सध्या मंडईत मिळणाऱ्या भाजीपाल्यावरही विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. या व्हिडीओत एका ट्रेनमध्ये काही लोक शौचालयाच्या दरवाज्या जवळ बसले आहेत. ही ट्रेन परराज्यातून मुंबईत येतेय. या ट्रेनमध्ये मलकापूर, भुसावळ जवळपास काही लोक आरक्षित डब्यात चढतात. टीसीदेखिल त्यांच्यावर कारवाई करत नाही. या लोकांकडे मेथी, हरबरे, पोकळा, कोथिंबीर इ्त्यादी भाजीपाला असतो. त्याचे गाठोडे बांधून ही लोक या शौचालयाजवळ बसतात. रात्री अधूनमधून भाजीपाला ताजा राहण्यासाठी शौचालयाचेच पाणी त्यावर मारतात. एवढंच नाही ह्या भाजीपाल्यांचे गाठोडे शौचालयात बांधून ठेवतात. मुंबईत सकाळी ट्रेन पोहचली की, हा भाजीपाला ते लोक मंडईत पोहचवतात. तिथे त्याची विक्री होते.

 भाजीपाला रात्री ट्रेनमध्ये टाकून मुंबईत विकणाऱ्या या लोकांकडे टीसी आणि रेल्वेपोलिसही कानाडोळा करतात. रात्री आरक्षित टिकीट न काढताही ह्या लोकांना आरक्षित डब्यात प्रवेश मिळतोच कसा हाही प्रश्नच आहे. ह्या लोकांना मुंबईकरांच्या आरोग्याशी काही घेणंदेणं नसावं म्हणून, भाजीपाल्यासारख्या गोष्टी शौचालयातून वाहून नेण्याचा प्रताप ते करत असावेत. निदान रेल्वे प्रशासनाने तरी अशा लोकांवर कारवाई करावी एवढी माफक अपेक्षा सर्वसामान्य मुंबईकर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्यक्त करतील.

Web Title -  you are eating Vegetables from train toilet 

संबंधित बातम्या

Saam TV Live