मॉलमधे जाण्यासाठी द्यावे लागणार पैसे, कोरोना अजून काय काय दिवस दाखवणार?

साम टीव्ही
रविवार, 2 ऑगस्ट 2020
  • मॉलमधे जाण्यासाठी द्यावे लागणार पैसे 
  • १० रूपये देऊनच मॉलमधे एंट्री
  • कोरोनाने दाखवले हेही दिवस

कधीकाळी मॉलमध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रवेश फी भरावी लागेल, याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण कोरोनाने हे दिवससुद्धा आणलेत. कारण ठाण्यात चक्क मॉल प्रवेशासाठी शुल्क आकारलं जातंय.

अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 5 ऑगस्टपासून राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आलीय. पण कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ठाण्यातील विवियाना मॉलने ग्राहकांना चक्क 10 रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय.

या निर्णयानुसार ग्राहकांना ऑनलाईन बुकींग करुन ठराविक काळासाठीच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी मॉल प्रशासनाने 'बुक माय शो' या ऑनलाईन तिकिट बुकींग संस्थेसोबत करार केला. ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश हवा असल्यास मॉलच्या अधिकृत वेबसाईटवर पूर्वनोंदणी करावी लागणार आहे. या पूर्वनोंदणीसाठी 10 रुपये शुल्क आकारण्यात आलंय. त्यानंतर ग्राहकांना एक क्यूआर कोड दिला जातो. आणि हा क्युआर कोड मॉलच्या गेटवर स्कॅन केल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोनाने आपल्या दैनंदिन जीवनाची परिभाषाच बदललीय. म्हणूनच कालपर्यंत सहजपणे फेरफटका मारण्याचं हक्काचं ठिकाण असलेल्या मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठीही अनेक दिव्य पार पाडावी लागतायत.


संबंधित बातम्या

Saam TV Live