लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

डोंबविलीकरांसाठी लोकल जीवघेणी ठरतेय. २२ वर्षीय चार्मी पासद या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय.

कधी थांबणार डोंबिवलीकरांचा जीवघेणा प्रवास?
चार्मी पासद, सध्या या जगात नाही, उज्ज्वल भविष्याचं स्वप्न उराशी बाळगून ती नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली,खरी मात्र लोकलमधील गर्दीनं तिच्या स्वप्नांचा चक्काचूर केलाय. चार्मीचा लोकलमधील गर्दीनं बळी घेतलाय

 कसा झाला चार्मीचा मृत्यू?

चार्मीनं सकाळी 9च्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्टेशनवरुन मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल पकडली. नेहमीप्रमाणे लोकलमध्ये गर्दी होती, तरीही कामावर लेट मार्क लागेल या भीतीनं तिनं लोकल पकडली. लोकल डोंबिवली कोपर दरम्यान आला असता गाडीच्या आतून जोरात लोड आला आणि दरवाज्यावर उभ्या असलेल्या चार्मीचा तोल गेला. आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं


कधी थांबणार डोंबिवलीकरांचा जीवघेणा प्रवास?

डोंबिवली स्टेशनवर होणारी गर्दी आणि गाड्यांची संख्या यावर नजर टाकल्यास. डोंबिवली स्टेशनमधून दररोज अंदाजे पाच लाख प्रवासी मुंबईला ये-जा करतात. डोंबिवली स्थानकातून दिवसभरात मुंबईसाठी 33 लोकल सुटतात, मात्र त्यापैकी फक्त दोन फास्ट लोकल आहेत. डोंबिवली स्थानकातून दिवसभरात जवळपास 850 लोकल मुंबईकडे जातात, मात्र या लोकल कल्याणहून खचाखच भरून येतात. त्यामुळं डोंबिवलीकरांना प्रवेशही मिळत नाही.

गेल्या वर्षभरात जवळपास 7 डोंबिवलीकरांनी लोकलच्या गर्दीमुळं आपले प्राण गमावलेत. अनेकदा मागणीकरुनही रेल्वे प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नाही. जलद गाडी पकडण्याचा डोंबिवलीकरांचा आटापिटाही समजण्याजोगा नाही. जिवाची परवा न करता लटकंती करत प्रवास करणं हे डोंबिवली करांसाठी नित्याचंच झालंय. भले 10 मिनिटं उशीरानं पोहचू पण वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणार नाही हे आता प्रत्येक डोंबिवलीकरांनी मनावर ठासायला हवं. तरच डोंबिवलीकरांचा प्रवास सुरक्षित होईल. 

Web Title - Young girl dead after falling from Dombivali local

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com