पब-जी वेड! व्हिडीओ काढून तरुणाची आत्महत्या

पब-जी वेड! व्हिडीओ काढून तरुणाची आत्महत्या

पबजी गेमच्या नादामुळे आजची तरुणाई वेडावली आहे. त्यामुळे तरुणांनी जीव द्यायला सुद्धा सुरुवात केलीय. या सारख्या वाढत्या घटनांमुळे पालक धास्तावले आहेत. त्यामुऴे तरुणांना याचून कसं बाहेर काढायचं असा मोठा प्रश्न समोर आहे. 

मुंबई : पबजी पायी वेड लागलेल्या तरुणाची घटना, ताजी असतानाच आता, पुण्यात पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलानं आत्महत्या केलीय. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय. या मुलानं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा मुलगा आजीसोबत राहायचा. विशेष म्हणजे मयत मुलाने आत्महत्या करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्याच्या मोबाईलमध्ये गेम सापडलेत. पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करतायत. 

पबजीच्या आहारी गेलेल्या या सोळा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तरुण आजीसोबत राहत होता. मोबाईलवर गेम खेळणे आणि टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचे त्याला व्यसन होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापासही झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने नवीन मोबाईल विकत घेतला होता. रविवारी रात्री त्याने मोबाईलवर गेम खेळत असताना आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकिस आला. घरात तो आणि आजी असे दोघेच रहात होते. मयत मुलाने आत्महत्या करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना अनेक गेम सापडले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी नोंद केलीय आणि अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करतायेत.

या पब-जीच्या वेडापाई आणखी किती जीव जाणार हे माहित नाही. मात्र यावर ऍक्शन घेणं आता खुप गरदजेचं आहे. कारण आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जिथे करिअर करणं महत्वाचं तिथं ही तरुणाई टिकटोक आणि पब-जीच्या दुनियेत अडकून स्वत:ची दुरावस्था करुन घेतेय. त्यामुळे यावर त्वरीत काहीतरी ऍक्शन घेतली गेली पाहिजे.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात
राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!
 

Web Title - a young guy sucide due to Pub-G 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com