VIDEO | चुनाभट्टीत कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 7 डिसेंबर 2019

मुंबईतल्या चुनाभट्टी भागात कारच्या धडकेत एका 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय...अर्चना पार्टे असं या तरुणीचं नाव आहे...चुनाभट्टी परिसरात राहणारी अर्चना पार्टे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास फूटपाथवरुन चालत होती.

मुंबईतल्या चुनाभट्टी भागात कारच्या धडकेत एका 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय...अर्चना पार्टे असं या तरुणीचं नाव आहे...चुनाभट्टी परिसरात राहणारी अर्चना पार्टे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास फूटपाथवरुन चालत होती. त्यावेळी भरधाव वेगात कारनं तिला धडक दिली...कार चालवणारा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय...दरम्यान या प्रकरणी अर्चना पार्टे हिच्या कुटुंबीयांना चुनाभट्टी पोलिस स्टेशनला घेराव घालत आंदोलन केलं...या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा अर्चना पार्टेच्या नातेवाईकांनी आणि स्थानिकांनि घेतलाय..या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय...दरम्यान, चुनाभट्टी पोलिस चौकीला पार्ठे कुटुंबाने घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत वाहन चालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृत्यू अर्चना पार्टेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आणि चुनाभट्टीतील रहिवाशांनी नकार दिला होता. 

 

 

 

 

 

 

 

दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती असून चुनाभट्टी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
जो पर्यंत दोषींवर तत्काळ कारवाई होत नाही, तो पर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौघांपैकी ३ आरोपींना अटक केली आहे.चुनाभट्टी परिसरात काल रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊच्या सुमाराला हा अपघात झाला. काल रात्री दोन तरुणीबाहेर निघाल्या असता त्यांची मैत्रिण अर्चना ही देखील कंटाळा आला म्हणून सहज त्यांच्यासोबत बाहेर निघाली होती. ती दोघींच्या काहिशी पुढे चालत होते. काही कळण्याच्या आत मागून भरधाव वेगात कार आली आणि अर्चनाला धडक दिली आणि कार तशीच पुढे निघून गेली. यात अर्चनाता मृत्यू झाला.
या घटनेनंतर सोबतच्या दोन मुलींना मोठा धक्का बसला असून त्यातील एक तरुणी अजूनही धक्क्यातून सावरलेली नाही.

 

WebTittle :Young woman dies in car crash


 

संबंधित बातम्या

Saam TV Live