घसा साफ करायला गेला आणि टुथब्रशच गिळला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नवी दिल्ली : एका युवकाने घसा साफ करताना टुथब्रश गिळल्याची घटना येथे नुकतीच घडली. एम्सच्या डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता टुथब्रश बाहेर काढल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.

नवी दिल्ली : एका युवकाने घसा साफ करताना टुथब्रश गिळल्याची घटना येथे नुकतीच घडली. एम्सच्या डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता टुथब्रश बाहेर काढल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.

एकाच्या सल्ल्यानुसार दिल्लीतील सीमापुरी भागात राहणारा अविद (वय 36) हा 8 डिसेंबर रोजी सकाळी टुथब्रशने घसा साफ करत होता. घसा साफ करत असताना 12 सेमी लांबीचा टुथब्रश घशाखाली गेला. परंतु, त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी त्याला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथेही त्याने काही सांगितले नाही. डॉक्टरांनी त्याला पेन किलर देत पोटदुखीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, औषधांचा काहीच परिणाम होत नव्हता, असे एम्सचे डॉ. प्रवीण अग्रवाल यांनी सांगितले.

डॉक्टरांनी छातीचा एक्स रे तसेच सीटी स्कॅन करुन पाहिले. पण यातून काहीच स्पष्ट होत नव्हते. मात्र, पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये पोटात काही तरी अडकल्याचे उघड झाले. शेवटी डॉक्टरांनी अविदला याबाबत विचारले असता त्याने ब्रश गिळल्याचे मान्य केले. एम्समधील डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे टूथब्रश बाहेर काढला आहे. नागरिकांनी टुथब्रश करताना काळजी घ्यायला हवी, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

WebTitle : marathi news youngster swallowed toothbrush while cleaning throat  


संबंधित बातम्या

Saam TV Live