लग्न मंडपात प्रियकराने लगावली नवरीच्या कानशिलात...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 मार्च 2020

प्रियकराने नवरीच्या लगावली कानशिलात 

हरिद्वारमधील लग्न समारंभातील विचित्र प्रकार

लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्यानंतर घडलीये घटना

 

हरिद्वार (उत्तराखंड) : विवाह मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर वधू-वरांना भेटवस्तू व शुभेच्छा देण्यासाठी नागरिक जात होते. यावेळी एकाने शुभेच्छा दिल्यानंतर नवरीच्या जोरात कानशिलात लगावली. यामुळे विवाहस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

हरिद्वार जवळ असलेल्या लंढैरा गावामध्ये ही घटना घडली.  नवरीच्या कानशिलात लगावणारा तिचा प्रियकर असल्याची माहिती पुढे आली. प्रियकराला उपस्थितांनी बेदम मारहाण केली. मात्र, यानंतर विवाह मोडण्याच्या तयारीत होता. पण, दोन्ही कुटुंबियांनी सामंजस्याची भूमिका घेतली.

विवाह पार पडल्यानंतर प्रियकर शुभेच्छा देण्यासाठी नवदांपत्याजवळ गेला. नवरीकडे त्याने पाहिले आणि जोरात कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाला. उपस्थितांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. एका ठिकाणी चहा पित बसला होता. यानंतर नवरदेवाचे दोन भाऊ त्याच्या जवळ गेले आणि पुन्हा बेदम मारहाण केली. यावेळी पुन्हा नागरिक जमा झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत नवरदेवाचा भाऊ आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title Youth Slapped Bride Than Man Beatten From People In Wedding At Haridwar


संबंधित बातम्या

Saam TV Live