स्टायलिश युवी आणि त्याचे गाजलेले लव-अफेअर्स..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

बेस्टेस्ट ऑलराऊडंर आणि स्फोटक बॅट्समन अशी युवराज सिंहची ओळख. स्मार्ट आणि स्टायलिश युवी जेवढा मैदानावर लोकप्रिय तेवढाच बाहेरही आणि म्हणून त्यांच्या अफेअर्सची संख्याही सगळ्यात जास्त आहे. 

बेस्टेस्ट ऑलराऊडंर आणि स्फोटक बॅट्समन अशी युवराज सिंहची ओळख. स्मार्ट आणि स्टायलिश युवी जेवढा मैदानावर लोकप्रिय तेवढाच बाहेरही आणि म्हणून त्यांच्या अफेअर्सची संख्याही सगळ्यात जास्त आहे. 

  • सुरुवात करुयात २००७ पासून. मोहब्बते फेम किम शर्मा आणि युवीचं अफेअर खूप काळ चाललं, हे दोघे लग्न करतील की अशी शक्यता असतानाच त्यांच्यात आली शमिता शेट्टी, आणि हे अफेअर तुटलं. 
  • त्यानंतर युवीचं नाव जोडलं गेलं ते डिंपल क्वीन दीपिका पदुकोणसोबत. अनेक पार्टीजमध्ये हे दोघे एकत्र दिसले, पण युवीच्या पझेसिव्ह नेचरमुळं या दोघांचं नातं तुटलं.
  • त्यानंतर आणखी एक क्युट गर्ल युवीच्या आयुष्यात आली ती म्हणजे प्रिती झिंटा, आयपीएलमुळं यां दोघांमध्ये जवळकीता वाढली. दोघांनी कायम मैत्री असल्याचं म्हटलं असलं तरी मैदानाबाहेर त्यांच्या अफेअरच्या गरमागरम चर्चा रंगल्या, पण कालांतराने त्यांचे मार्ग वेगळे झाले.

  • त्यानंतर रिया सेन या बंगाली बालेशीही युवीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या, पण काहीच कालावधीसाठी.
  • त्यानंतर जुहूच्या एका लाऊंज बारमध्ये अभिनेत्री मिनिषा लांबाला किस करताना अनेकांनी पाहिलं आणि बरंच गॉसिप झालं, पण आपल्यात असं काही झालं नसल्याचं या दोघांनी सांगितलं.
  • मग २०१४ मध्ये युवीचं नाव जोडलं ते नेहा धुपियासोबत.. सोफी चौधरीच्या एका पार्टीत या दोघांची भेट झाली आणि दोघे प्रेमात बुडाले, पण हेही रिलेशनशीप फार काळ टिकलं नाही. 

युवीची कारकिर्द जेवढी गाजली तेवढी अफेअर्सही. अखेर २०१५ मध्ये ऍक्ट्रेस हेजल किचसोबत युवराजनं लग्नगाठ बांधली आणि अफेअर्सची चर्चा संपली. आणि हे दोघेही सुखाचा संसार करतायत. युवीच्या सेकंड इनिंगसाठी खुप साऱ्या शुभेच्छा.

WebTitle : marathi news youvraj sing cricket and his love affairs 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live