युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

मुंबई  : पाकिस्तानसोबतचे सामने कायम लक्षात राहतील म्हणत भारताचा झंझावाती खेळाडू युवराज सिंग याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. मुंबईत पत्रकार परिषद घेत युवराज सिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केलीये.

"मी कधीही हार मानली नाही मात्र, प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो की थांबावं लागतं आणि कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे.  दरम्यान, निवृत्ती घोषित करावी हे वर्षभरापासून मनात असल्याचं युवराज सिंगने म्हटलंय. माझ्या खडतर वेळेत माझ्या आईने मला साथ दिली म्हणत युवराज सिंगने आईचे विशेष आभार मानलेत. युवराज सिंग भारतासाठी ४० कसोटी सामने आणि ३०४ एकदिवसीय सामने खेळलाय.   

वर्ल्डकप जिंकून वडिलांचं स्वप्न पूर्ण  केल्याचा अभिमान असल्याचंही युवराज सिंग पत्रकार परिषदेत म्हणाला. निवृत्ती घोषित करताना युवराज सिंगचे डोळे पाणावले होते. निवृत्तीनंतर युवराज सिंग कॅन्सरग्रस्तांची सेवा करणार आहे .  

युवराज सिंगने सहा चेंडूत सहा षटकार ठोकल्याचा व्हिडीओ पाहा   

Web Title: marathi news yuvraj singh announces retirement form international first class cricket d 

संबंधित बातम्या

Saam TV Live