झोटिंग समितीची खडसेंना क्‍लीन चिट : सुभाष देसाई

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

नागपूर - जमीन गैरव्यवहारप्रकरणी न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंबाबत कोणतेही दोषारोपण केलेले नसल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज स्पष्ट केलं. 

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन आपल्या नातेवाइकांना अधिकाराचा गैरवापर करून दिल्याचा तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झाला होता. या प्रकरणी खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय खळबळ उडाली होती. खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी चौकशी सुरू केल्याची चर्चा रंगली होती. विरोध पक्षानेही खडसेंचा मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी हे षडयंत्र आखल्याचा आरोप केला होता. याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. समितीचे कार्यालय नागपूर येथील रविभवन येथे स्थापित करण्यात आले. ही जमीन उद्योग विभागाची असल्याचा दावा करण्यात होता. तर खडसेंनी ही जमीन संपादित झाली नसल्याचे दावा केला होता. 

संबंधित बातम्या

Saam TV Live