ZP Election Result - भाजपला बालेकिल्ल्यात दणका तर सेनेला बऱ्याच ठिकाणी यश

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढं आलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकांनंतर पहिला दणका बसला आहे. राज्यातील सहा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय.

नागपूर, धुळे, पालघर, नंदूरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषद निवडणुकांचा बुधवारी (ता.8) निकाल लागला. भाजपचा बालेकिल्ला समजली जाणारी नागपूरची जिल्हा परिषद राखण्यातही भाजपला अपयश आलंय. नागपूर, पालघरमध्ये भाजपचा पराभव झालाय. तर धुळे जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या हातातून निसटलीय.

वाशिम, नंदूरबारमध्ये त्रिशंकू 

वाशिममध्ये त्रिशंकू कौल मिळालाय. राष्ट्रवादीला सर्वाधिक 10 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप, शिवसेनेला प्रत्येकी 7 जागा आहेत. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस (9 जागा) यांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. तर, नंदूरबारमध्ये मंत्री के. सी. पाडवी यांना धक्का बसला आहे. तेथे काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 23 जागा मिळाल्या आहेत. तेथेही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन करू शकते. 

शिवसेनेला सर्वाधिक फायदा!

भाजपला नागपूर जिल्हा परिषदेत गेल्या वेळी 22 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांना 15 जागांवर समाधान मानावं लागलंय. तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही चांगली बढत मिळालीय. काँग्रेस 19 जागांवरून 30 तर, राष्ट्रवादी 7 वरून 10 वर गेलीय. अकोल्यात भाजप 11 वरून 7 जागांवर आलीय. तर पालघरमध्ये भाजपला फटका बसलाय. पण, एकूण जागांचा विचार करता भाजपची जिल्हा परिषद संख्या 53 वरून 102वर गेलीय. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, शिवसेनेला सर्वाधिक फायदा झाला असून, त्यांची सदस्य संख्या 21 वरून 48 झालीय.जाणून घ्या जिल्हा परिषदांचे निकाल :- 

नागपूर - 58 जागा
काँग्रेस - 30 
राष्ट्रवादी - 10
भाजप - 15
शेकाप - 1
शिवसेना - 1
अपक्ष - 1

वाशिम - 52 जागा 
राष्ट्रवादी - 10 
काँग्रेस - 9
भाजप - 7 
शिवसेना - 7
अपक्ष - 2 
जिल्हा जनविकास आघाडी - 7 
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

अकोला - 53 जागा 
भारिप - 19 
शिवसेना - 11
भाजप - 5 
राष्ट्रवादी - 3
काँग्रेस - 3 
अपक्ष - 4 

नंदूरबार - 56 जागा 
काँग्रेस - 23 
भाजप - 23 
शिवसेना - 7 
राष्ट्रवादी - 3 

पालघर - 57 जागा 
शिवसेना - 18 
राष्ट्रवादी काँग्रेस - 16 
भाजप - 11
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - 5
काँग्रेस - 1
बहुजन विकास आघाडी - 4 
अपक्ष - 2

धुळे - 55 जागा 
भाजप - 38 
काँग्रेस - 4 
शिवसेना - 3 
राष्ट्रवादी - 0
अपक्ष - 1

Web Title: Maharashtra Zilla Parishad elections 2020 BJP lost in Nagpur and Palghar

संबंधित बातम्या

Saam TV Live