टिकटॉक चीनशी संबंधी तोडणार?  टिकटॉकचं मुख्यालय चीनमधून हलवणार

साम टीव्ही
सोमवार, 13 जुलै 2020
  • टिकटॉकचं मुख्यालय चीनमधून हलवणार
  •  भारतातील टिकटॉक बॅनचा कंपनीला धक्का
  •  चीनशी डेटा शेअरचा आरोप कंपनीच्या जिव्हारी

भारतात सर्वात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हे चिनी ऍप आता बंद झालंय. त्यानंतर आता अनेक देशही टिकटॉक बॅनचा विचार करताहेत. आपल्या अस्तित्त्वावरच संकट आल्यानं आता चिनशी कायमचे संबंध तोडण्याचा विचार कंपनी करतेय. काय घडलंय असं...वाचा

जे अॅप काहीच दिवसात तरुणांचं आवडतं बनलं. आपल्या कला जिथं अनेकांना सादर करता येत होत्या. आणि जे अॅप चीनशी संबंधित असल्यानं आणि युजरचा डेटा शेअर करत असल्याच्या संशयानं धोक्यात आलं. ते टिकटॉक आता आपल्यात अनेक बदल करतंय.

यातील सर्वात मोठा बदल आहे तो टिकटॉकची मुख्य कंपनी असलेल्या बाईटडान्सचं मुख्यालय चीन बाहेर हलवणं. यासाठी आता कंपनीच्या प्रशासनात हालचाली सुरु झाल्यात.

भारतानंतर अमेरिकेनंही चिनी अॅप बंदीवर विचार सुरु केलाय. असाच विचार अनेक देशही करताहेत. हेच पाहता आता कंपनीनं चीनशी संबंध तोडण्याचा. आणि स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.आणि मुख्यालय भारताबाहेर हलवणं त्याचा मुख्य भाग असल्याचं बोललं जातंय.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आम्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल कटीबद्ध आहोत, टिकटॉक असा मंच आहे जिथं नवीन कलाकारांना संधी मिळते, आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो. यातून जगभरातल्या लाखो लोकांना आनंद मिळतो. त्यामुळंच आम्ही ग्राहक, कलाकारांचे अधिकार आणि सुरक्षितता अबाधित निर्णय घेऊ

टिकटॉकवर चिनी सरकारसोबत युजरचा डेटा शेअर करण्याचे अनेक आरोप झालेत. मात्र, भारतानं यावर थेट कारवाई करत टिकटॉक बॅन केलंय..यानंतर आता अनेक देशात हे अॅप बॅन होऊ शकतं असं कंपनीला वाटतंय. म्हणून चीनशी संबंध तोडून स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर चिनी सरकारला हा मोठा झटका असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live