Video | ...आणि तिने घेतली राज ठाकरेंची पप्पी

विशाल सवणे
सोमवार, 16 मार्च 2020

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होईल की नाही, याची शंका वाटत होती. मात्र अखेर राज ठाकरेंनीही रुद्राणीचा हट्ट पुरवला आणि तिची भेट घेतली.

मुंबई - राज ठाकरेंची लोकप्रियता किती आहे हे, वेगळं सांगायला नको. त्यांना मतं मिळत नसली, मनसेचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येत नसले, तरीही त्यांची लोकप्रियता तिळमात्रही कमी झालेली नाही. त्यांचच उदाहरण देणारी एक घटना समोर आली आहे. 

 

झालं असं की एका चिमुकली राज ठाकरेंनी मोठी फॅन. या चिमुकलीचं नाव रुद्राणी. रुद्राणीने आई वडिलांकडे हट्ट धरला. हा हट्ट होता राज ठाकरे (Raj Thackrey) यांना भेटण्याचा. मला राज ठाकरेंकडे न्या, असं म्हणत रुद्राणीने आई वडिलांकडे हट्ट धरला. मुलीचं मन मोडायचं कसं, या विचाराने आई वडिलही रुद्राणीला घेऊन कृष्णकुंजवर पोहोचले. 

 

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होईल की नाही, याची शंका वाटत होती. मात्र अखेर राज ठाकरेंनीही रुद्राणीचा हट्ट पुरवला आणि तिची भेट घेतली. राज ठाकरेंनी भेट घेऊन रुद्राणीलाली आनंद झाला. यावेळी राज ठाकरेंनीही आपुलकीने या चिमुरड्या रुद्राणीला जवळ घेत तिची विचारपूस केली. मला का भेटायचं होतं, असा प्रश्न राज ठाकरेंनी रुद्राणीला विचारला. त्यावेळी छोट्या चिमुरडीने राज ठाकरे यांच्या जवळ जात मायेने त्यांच्या गालावर पप्पी दिली. राज ठाकरेंनी वडिलधाऱ्याप्रमाणे या चिमुकलीच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले. तसेच एका पिशवीत गोड खाऊ दिला. राज ठाकरे आणि चिमुकलीच्या भेटीमुळे सगळ्यांना सुखद धक्का मिळाला. 

 

पाहा Video - 

 

 

 

हेही वाचा - थिरकणं बंद! कोरोनामुळे मुंबईतील डिस्को आणि पब बंद ठेवण्याचे आदेश

हेही वाचा - मुंबईपाठोपाठ आता 'या' ठिकाणीही जमावबंदी

हेही वाचा - CORONA GO रे म्हाराजा, देवगडात कोरोना रोखण्यासाठी घातलं गा-हाणं

 

mns mumbai mns birthday story marathi marathi raj thackrey kissed by birthday girl 


संबंधित बातम्या

Saam TV Live