प्रवासी भारतीय आणि आणि आमच्यात फक्त एका ट्विटचं अंतर : सुषमा स्वराज

 प्रवासी भारतीय आणि आणि आमच्यात फक्त एका ट्विटचं अंतर : सुषमा स्वराज

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे कौतुक करत, आपल्यात आणि नागरिकांमध्ये एका ट्विटचे अंतर असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भारताच्या इतर देशांमधील दूतावासाच्या कामाचे ही कौतुक केले. भारताचा दूतावास हा आपल्या नागरिकांना अत्यंत उत्तम प्रकारे मदत करत आहे. 'प्रवासी भारतीयांना कोणतीही अडचण आली, तरी त्यांना हा विश्वास आहे की, भारत सरकार त्यांच्या अडचणी सोडवेल.' भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या सध्या व्हिएतनाम आणि कंबोडियाच्या दौऱ्यावर असून, व्हिएतनामची राजधानी हनोई येथे त्या बोलत होत्या.

तसेच त्यांनी सांगितले की, आधी पेक्षा जास्त चांगल्या प्रकारे सर्व दूतावास आता काम करत आहे, लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत आहेत, पंतप्रधानांनी इतर देशातील भारतीयंना गर्व वाटेल अशी कामगिरी केली आहे, तर परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी अनेक घटनांमध्ये भारतीयांना मदत केली आहे. 

स्वराज या ट्विटरवरून नागरिकांशी संपर्कात असतात, नाकरिकांना कोणतीही अडचण असली व ती त्यांनी ट्विटरद्वारे स्वराज यांच्यासमोर मांडली, तर त्याला लगेच प्रतिसाद मिळतो व अडचण सोडवण्यासाठी पावले उचलली जातात. नुकतीच त्यांनी अमेरिकेत पासपोर्ट हरविलेल्या एका भारतीयाला मदत केली होती.   

नागरिकांना ट्विटरवर प्रतिसाद द्यायच्या स्वराज यांच्या कृतीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली होती. 'स्वराज यांना लोकांचे व्हिसा मिळवून देण्याशिवाय काही काम नाही' अशा शब्दात राहुल यांनी स्वराज यांची खिल्ली उडवली होती. 

Web Title: distance in between external affair ministry and citizens is of one tweet away says sushama swaraj


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com