अटल, अढळ, अचल अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन...  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अटल, अढळ, अचल असे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झालेत. राजघाटाजवळील राष्ट्रीय स्मृतीस्थळावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर अंत्यविधी करण्यात आलेत. अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला.

अटलबिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय राजघाटाजवळील राष्ट्रीय स्मृतीस्थळावर त्याचबरोबर नवी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेला पाहायला मिळाला. दरम्यान, वाजपेयी यांचा अंत्यविधी सुरु होण्याआधी ३०० जवानांनी अटलजी यांना मानवंदना देण्यात आली.    

वाजपेयींच्या अंत्ययात्रेत मोदी चालले पायी

देशाचा पंतप्रधान एका माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पूर्णवेळ सहभागी झाल्याची घटना आज प्रथमच अनुभवास आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत भाजप मुख्यालयापासून ते अंत्यसंस्काराच्या राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यंत मोदी सहभागी झाले. हे अंतर सहा किलोमीटर होते. मोदी यांनी आपली गुरूभक्ती या निमित्ताने दाखवली. वाजपेयी हे एम्समध्ये रुग्णालयात असताना मोदी हे दोन-तीन वेळा त्यांची भेट घेण्यास गेले. अंत्यसंस्काराच्या नियोजनात त्यांनी लक्ष घातले. वाजपेयी यांच्याबद्दलच्या आपल्या भावना त्यांनी उत्कट शब्दांत व्यक्त केल्या होत्या. अतिशय धीरगंभीर चेहऱ्याने मोदी हे गेले दोन दिवस वावरत होते.

Web Title : marathi typing Atal Bihari Vajpayee merged with infinity

संबंधित बातम्या

Saam TV Live