महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील सजली शिवमंदिरं !

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

आज महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरं सजलीएत. राज्यातही महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. शिवरात्रीनिमित्त आज भीमाशंकरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीये. पहाटेच भीमाशंकर येथील मंदिरात विधीवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला. भीमाशंकरचं देऊळ हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. दुसरीकडे मुंबईतील बाबुलानाथच्या शिवमंदिरातबी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील शिवमंदिरंही सजलीयेत. मंदिरांना रोषणाईदेखील करण्यात आली आहे. पूजा आणि अभिषेक करण्यासाठी भाविकांमध्ये लगबग पाहायला मिळतेय.

आज महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरं सजलीएत. राज्यातही महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. शिवरात्रीनिमित्त आज भीमाशंकरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीये. पहाटेच भीमाशंकर येथील मंदिरात विधीवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला. भीमाशंकरचं देऊळ हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. दुसरीकडे मुंबईतील बाबुलानाथच्या शिवमंदिरातबी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील शिवमंदिरंही सजलीयेत. मंदिरांना रोषणाईदेखील करण्यात आली आहे. पूजा आणि अभिषेक करण्यासाठी भाविकांमध्ये लगबग पाहायला मिळतेय. तर तिकडे औरंगाबादमधील घृष्णेश्वर शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळ पासूनच मोठी गर्दी केली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने हे भाविक वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात दाखल झाले आहेत.

उजैनमध्ये शंकराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी

उजैनमध्ये भाविकांनी शंकराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केलीये. महाशिवरात्री निमित्तानं हर हर महादेव च्या गजरानं आसमंत दुमदुमलाय. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त देशभऱातील विविध शिवमंदिरांमध्ये शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक करण्यासाठी लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळतेय. दिव्यांची रोषणाई आणि फुलांची सजावटही शिवमंदिरांमध्ये पाहायला मिळतेय.    
 


संबंधित बातम्या

Saam TV Live