सीमा विधाते यांची चांदीच्या सिंहासनाची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाकारली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पुण्याच्या मनसे कार्यकर्त्या सीमा विधाते यांची चांदीच्या सिंहासनाची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाकारलीये. या चांदीच्या सिंहासनाची किंमत 18 लाख रुपये एवढी आहे. सीमा विधाते हे चांदीचं सिंहासन घेवून कृष्णकुंजावर आल्या मात्र राज ठाकरेंनी ही भेट स्विकारण्यास नकार दिलाय. 2019 ला मनसेची सत्ता आलीच पाहिजे अशी या मनसैनिकांची अपेक्षा आहे. बाळासाहेबांचंही एक चांदीचं सिंहासन आहे आणि हिच प्रेरणा मनात ठेवून मनसैनिकांनी हे सिंहासन आणलं मात्र त्यांची निराशा झाली.

पुण्याच्या मनसे कार्यकर्त्या सीमा विधाते यांची चांदीच्या सिंहासनाची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाकारलीये. या चांदीच्या सिंहासनाची किंमत 18 लाख रुपये एवढी आहे. सीमा विधाते हे चांदीचं सिंहासन घेवून कृष्णकुंजावर आल्या मात्र राज ठाकरेंनी ही भेट स्विकारण्यास नकार दिलाय. 2019 ला मनसेची सत्ता आलीच पाहिजे अशी या मनसैनिकांची अपेक्षा आहे. बाळासाहेबांचंही एक चांदीचं सिंहासन आहे आणि हिच प्रेरणा मनात ठेवून मनसैनिकांनी हे सिंहासन आणलं मात्र त्यांची निराशा झाली. मात्र यावेळी राज ठाकरेंनी सिंहासनासोबत आणलेल्या पत्रावर 2019ला मुख्यमंत्री नक्की होणार असं लिहून त्यावर स्वाक्षरी केलीये.


संबंधित बातम्या

Saam TV Live