विखे-पाटलांना मिळणार कॅबिनेटमंत्रिपद?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 मे 2019

मुंबई : सध्या काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील आणि जयदत्त क्षीरसागर या नेत्यांची वर्णी कॅबिनेटपदी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नगर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली. डॉ. सुजय विखे यांच्या राजकीय भूमिकेमुळे राधाकृष्ण विखे यांना राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, विखे-पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

Web Title: Possibilities of Vikhe Patil get Cabinet ministry

संबंधित बातम्या

Saam TV Live