नगरमध्ये पुन्हा एकदा सैराट...नगरमध्ये पतीपत्नीला जाळले,पत्नीचा भाजुन मृत्यु

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मे 2019

नगर : पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. या घटनेत पती जखमी असून पत्नीचा भाजून मृत्यू झाला आहे.

नगर : पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. या घटनेत पती जखमी असून पत्नीचा भाजून मृत्यू झाला आहे.

निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारा मंगेश चंद्रकांत रणसिंग याचा रुक्मिणीशी प्रेमविवाह झाला होता. मंगेश हा रुक्मिणीला माहेरहून आणण्यासाठी निघोज येथे आला असता रुक्मिणीचे वडील रामा भारतीया, काका सुरेंद्रकुमार भारतीया व मामा घनश्याम रानेज यांच्याशी वाद झाला आणि त्यातून या तिघांनी मंगेश आणि रुक्मिणीला घरात कोंडून मारहाण केली. त्यानंतर पेटवून दिले यात रुक्मिणीचा मृत्यू झाला. तर मंगेश हा जखमी असून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटने संदर्भात 2 आरोपींना अटक केली असून 1 आरोपी फरार आहे.

6 महिन्यांपूर्वी रूख्मिणी मंगेशचा विवाह झाला होता. रुख्मिणी 2 महिन्याची गर्भवती होती. तिच्या घरच्यांना हा आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने त्या दोघांना जाळण्याचा प्रयत्न केला गेला अशी प्राथमिक माहिती आहे.

Web Title: try to honor killing at Nagar and wife dies

संबंधित बातम्या

Saam TV Live