रेल्वेखाली बाईकचा चुराडा...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मे 2019

औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. 

औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. 

शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी रेल्वेस्थानका दरम्यान सोमवारी (ता. सहा) सकाळी दहा वाजेच्या सुमारास मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडी औरंगाबादच्या दिशेने येत होती. त्याचवेळी एक व्यक्ती हिरो मेस्ट्रो दुचाकी घेऊन रेल्वे रुळ ओलांडत होता. रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच त्या व्यक्‍तीने दुचाकी सोडून पळ काढला. क्षणार्धात आलेल्या रेल्वेने दुचाकी पाचशे मिटर ओढत नेली.

यामध्ये दुचाकीचा चुराडा झाला, पेट्रोल टाकीचाही भुगा झाला. रेल्वेच्या रुळातून निघणाऱ्या ठिणग्या आणि पेट्रोलचा संपर्क आला तरीही आग लागून मोठा अनर्थ झाला असता, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या अपघाताने रेल्वे रुळाच्या तीस चाव्या (लॉक) निघाल्याने रेल्वे रूळ कमकुवत झाल्याने या मार्गावरुन धिम्या गतीने रेल्वे नेण्यात आल्या. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

Web Title: 2 wheeler crashed under railway at Aurangabad


संबंधित बातम्या

Saam TV Live