ठाकरे सरकारचा चेहरा उघडा करण्यासाठी 22 रोजी राज्यात भाजपचे आंदोलन : चंद्रकांत पाटील

 ठाकरे सरकारचा चेहरा उघडा करण्यासाठी 22 रोजी राज्यात भाजपचे आंदोलन : चंद्रकांत पाटील

मुंबई : ठाकरे सरकारचा चेहरा उघडा पाडण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली. 

नवी मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनात पाटील बोलत होते. आजच्या अधिवेशनास पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह राज्यातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 

आजच्या अधिवेशनात भाजपच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला लक्ष्य केले. भाजपचे नेते संजय कुटे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने घात केला असा त्यांच्या भाषणाच सूर होता. 

कुटेंपाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. 22 फेब्रवारीरोजी प्रामुख्याने तहसील कार्यालयाबाहेर भाजपतर्फे आंदोलन केले जाणार आहे.  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com