Loksabha 2019 : एक ते दीड तास इव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा उत्साह मावळला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

मुंबई : इव्हीएम मशिन मध्ये सकाळी झालेल्या बिघाडामुळे मतदारांच्या उत्साहावर विर्जण पडले.अनेक ठिकाणी मतदारांचा खोळंबा झाला.सकाळी बोरीवली येथील दोन मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडामुळे मतदार रखडले होते तर दुपार पर्यंत कलिना विधानसभा मतदार संघात ईव्हीएम बिघाडाचा खेळ सुरु होता. 

पवई येथील तिरंदाज व्हिलेज महानगर पालिका शाळेत दोन ईव्हीए मशिन एक ते दिड तास बंद होत्या.मालाड मध्येही ईव्हीएम बंद पडल्याने मतदानावर परीणाम झाला.काही काळ मतदान बंद झाल्याने मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.कुर्ला येथील मतदान केंद्रावर अशीच परीस्थीती होती. 

कलिना विधानसभा मतदार संघात व्हिव्हीपॅट मशिन मध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होता.तसेच काही मशिनच बॅटरीही लो झाल्याने अडचणी येत होत्या.त्यामुळे त्याचा मतदानाही परीणाम जाणवत होता.उत्तर मध्य मुंबईत उपनगरातील सर्वात कमी म्हणजे 28.56 टक्के मतदान झाले आहे. 

मतदान केंद्र उघडलेच नाही 
बोरीवली पश्‍चिमेकडील गोराई आणि सुविदयाल ही मतदान केंद्र सकाळी 7 वाजण्या ऐवजी तासभर उशीराने सुरु करण्यात आली असल्याची तक्रार मतदार करत आहे.सकाळी सात पुर्वीच मतदारांना रांगा लावल्या जात होत्या. मात्र, कर्मचाऱ्यांकडून कोणतीही सुचना न देता मतदान सुरु करण्यात आले नाही.

Web Title: Loksabha 2019 Due to the EVM disruption the voters goes back

संबंधित बातम्या

Saam TV Live