सॉरी मम्मी... मी तिच्याशिवाय जगू शकत नाही,‘मदर्स डे’च्या दिवशी युवकाची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 मे 2019

नागपूर - ‘सॉरी मम्मी... मी तिच्यावर खूप प्रेम करीत होतो. आता तिच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात काहीही उरले नाही. मीसुद्धा तिच्याशिवाय जगू शकत नाही.’ अशी सुसाईड नोट लिहून एका युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. आज रविवारी संपूर्ण जगात ‘मदर्स डे’ साजरा केला जात असताना एका मातेवर काळजाच्या तुकड्याला कायमचा निरोप देण्याची वेळ आली. ही दुर्दैवी घटना आज रविवारी यशोधरानगरात उघडकीस आली. सम्यक खुशाल मेश्राम (वय १९, रा. पाटीलनगर, यशोधरा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशाल मेश्राम हे एका हॉटेलमध्ये कूकचे काम करतात. त्यांना मुलगा सम्यक आणि दोन मुली आहेत. सम्यकचे धंतोलीत राहणाऱ्या एका युवतीवर खूप प्रेम होते. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमाची कुणकूण लागली. त्यामुळे प्रेमात जात-पात आणि कुटुंबाचा विरोध असल्यामुळे दोघेही निराश होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्या युवतीने तिच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी आत्महत्येस सम्यकला जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हापासून तो तणावात होता. शेवटी सम्यकनेही जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सायंकाळी आई आणि दोन्ही बहिणी नातेवाइकांकडे गेल्या होत्या. घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने छताच्या लोखंडी पाइपला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री अकराला वडील घरी आल्यानंतर दार आतमधून बंद असल्याचे दिसले. दार ठोठावले असता आतमधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खिडकीतून डोकावले असता सम्यक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: Lover Suicide Crime

संबंधित बातम्या

Saam TV Live