ममता बनर्जींनी मोदींशी बोलणे टाळले...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 मे 2019

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) फोन आला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील फणी वादळासंदर्भात ममता बॅनर्जी यांना फोन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडून राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला. तसेच ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी फोन केला होता. मात्र, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलण्याचे टाळले होते. त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांना फोन करण्यात आला. पण ममता बॅनर्जी यांनी बोलण्यास नकार दिला. 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या या आरोपानतर पंतप्रधान कार्यालयाने सांगितले, की पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनीच फोन घेण्यास नकार दिला.

Web Title: Mamata Banerjee Refuse to call From PM Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live