नवऱ्याचा खून करून मित्रांसोबत चॅट करायची माजी मुख्यमंत्र्याची सून

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

नवी दिल्ली: रोहित तिवारी हत्या प्रकरणात आता दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारीची पत्नी अपूर्वानं गुन्हा कबुल केला आहे. सध्या अपूर्वा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. रोहितची हत्या केल्यानंतर अपूर्वानं सारं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता.

रोहितची हत्या केल्यानंतर तपासाअंती अपूर्वा रोहितच्या मित्रांसोबत व्हॉट्सअ‍ॅप चाट करत होती. रोहितचा मृत्यू हा हार्ट अटॅकनं झाला असं भासवण्याचा ती प्रयत्न करत होती. अपूर्वानं सर्व गोष्टी पोलिसांपासून लपवण्यासाठी मोबाईल पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी फॉरमॅट केला होता. शिवाय फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपची चाट हिस्ट्री देखील डिलीट केली.

अपूर्वाची मोबाईल हिस्ट्री चेक केल्यानंतर सर्व खुलासे होत आहेत. पोलिसांना या साऱ्या प्रकरणांचा सुगावा लागू नये म्हणून अपूर्वानं व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिलीट करण्याचा प्रयत्न केला. पण, या साऱ्या गोष्टी आता समोर आल्या आहेत.

Web Title: rohit shekhar murder case wife try to finish proof and whats aap connection updated

संबंधित बातम्या

Saam TV Live