पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी, मोदींनी केली पुजा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 मे 2019

केदारनाथ : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपताच आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी लीन झाले असून, त्यांनी विशेष पूजा केली. उद्या (रविवार) ते बद्रिनाथचे दर्शन घेणार आहेत.

केदारनाथ : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपताच आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी लीन झाले असून, त्यांनी विशेष पूजा केली. उद्या (रविवार) ते बद्रिनाथचे दर्शन घेणार आहेत.

गेल्या पाच वर्षांतील मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे. आज सकाळी त्यांनी गढवाली पोशाखात केदारनाथ मंदिरात पूजा केली. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. त्यापूर्वी मोदींनी टेम्पल रन सुरु केले आहे. मोदींचा आज केदारनाथमध्येच मुक्काम असून, उद्या ते बद्रिनाथचे दर्शन घेतील. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 'केदारनाथ'चे मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. डोंगरावर पांघरलेली बर्फाची चादर अन्‌ थंडगार हवेमुळे या आल्हाददायक वातावरणाने केदारनाथचे दर्शन आनंददायी ठरत आहे. 

नरेंद्र मोदी केदारनाथच्या दर्शनाला येणार असल्याने या भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोदी हे दिवाळीत आणि अक्षयतृतीया असे दोन वेळा केदारनाथ येथे दर्शनाला येत असतात. या वेळी ते अक्षयतृतीयेला येऊ न शकल्याने त्यांचा दौरा आज करण्यात आला. मोदी येण्याच्या काही तास आधी सुरक्षा यंत्रणा मंदिर परिसर ताब्यात घेऊन दर्शन बंद करण्यात आले होते. 'केदारनाथ'च्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. यावर्षीचे दर्शन सुरू झाले आहे. गौरीकुंड येथून पायी तसेच घोड्यावर बसून सात ते आठ तासांचा प्रवास करून केदारनाथच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. केदारनाथला हेलिकॉप्टरने गेल्यास अवघ्या 15 मिनिटांत तेथे पोचता येते, त्यामुळे नऊ हजार रुपये तिकीट असले तरी त्यास मोठा प्रतिसाद आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi offers prayers at Kedarnath temple


संबंधित बातम्या

Saam TV Live