धुळ्यातील मंदिर उडवण्याची धमकी, धुळे शहरात खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 मे 2019

धुळे : शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य स्वामीनारायण मंदिराला काल पोस्टाव्दारे धमकीचे दोन पत्र प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत मंदिरास प्राप्त पत्रानुसार काल रात्री आणि आज सकाळी पोलिसांनी मंदिराला भेट देत तपासणी केली. तसेच मंदिराच्या प्रमुख स्वामींशी चर्चा केली. दरम्यान मंदिरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 

धुळे शहरातील देवपूर परिसरात नव्याने भव्य स्वामी नारायण मंदिर उभारण्यात आले आहे. पोस्टाने दोन वेगवेगळी बंद पाकीटे आणि त्यात दोन वेगवेगळी पत्रे मंदिराला प्राप्त झाली. त्यात हिंदीमध्ये 'मंदिर उडा देंगे.. जगा और तारीख हम तय करेंगे' अशी धमकी दिली आहे. याबाबत बीएपीएस स्वामीनारायण मंदिरातर्फे तत्काळ देवपूर पोलिस ठाण्याला लेखी पत्राव्दारे माहिती देण्यात आली. तसेच हे मंदिर जागतिक तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ बनलेले असून रोज देश, विदेशातील भक्तांची आणि पर्यटकांची येथे गर्दी असते. गांधीनगर, अक्षरधाम प्रमाणेच हे मंदिरही जगाच्या नकाशावर आलेले आहे. तरी या पत्रांबाबत तपास करावा आणि सुरक्षा वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचार्‍यांनी मंदिराला भेट देवून पाहणी केली. मंदिराच्या प्रमुख स्वामींची चर्चा केली. तसेच मंदिरात पोलिस कर्मचार्‍यांचीही नियुक्त करण्यात आली आहे.

Web Title: Threatening letter of to attack on a Swaminarayan temple at Dhule

संबंधित बातम्या

Saam TV Live