अहमदनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती; मुलगी ठार, मुलगा गंभीर जखमी

सचिन अग्रवाल, साम टीव्ही, अहमदनगर
सोमवार, 6 मे 2019

एकमेकांसोबत खुश दिसणाऱ्या या दोघांचा आनंद मुलीच्या घरच्यांना पाहावला नाही. मंगेश आणि रुक्मिणीचं ६ महिन्यांपुर्वीच लग्न झालं होतं. मात्र लग्न आंतरजातीय असल्यानं रुक्मिणीच्या घरच्यांना लग्नच मान्य नव्हतं. 

सहा महिन्यानंतर राग मावळला असेल, त्यामुळं माहेरच्या ओढीनं मुलगी घरी आली. पण पाझर फुटतील घरचे कसेल. जावई आणि मुलगी घरी येताच मुलीच्या वडिलांनी, काकांनी, आणि मामानं जावई मंगेश रणसिंगला मारहाण केली. त्यामुळं परत घरी जायला निघालेल्या रुक्मिणीला बघून घरच्यांचा पारा तापला आणि त्यांनी मुलगी आणि जावयाला घरात कोंडून जाळण्याचा प्रयत्न केला. यात दोघेही गंभीर झाल्यानं त्यांना तातडीनं पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मंगेश गंभीर जखमी आहे. मुलीचे मामा आणि काकांना पोलिसांनी अटक केली तर फरार मुलीच्या वडिलांचा शोध पोलिस घेतायत. 

जीवापेक्षा, मुलीच्या आनंदापेक्षा जात महत्त्वाची वाटणारा आपला समाज, नेमका बदलणार तरी कधी ? कधीपर्यंत पोकळ समाजिक जाणिवा आपण जपत राहणार आहोत. हे सगळं बदलायला हवं.

संबंधित बातम्या

Saam TV Live