एकनाथ खडसेंनी धरलं सरकारला धारेवर...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई : राजकियहेतूने प्रेरित होवून तथ्यहिन आरोप केले जातात. त्याची चौकशी होते. त्यात काहीच तथ्य निघाले नसल्याने आरोप तथ्यहिन निघाल्यावर आरोप करणाऱ्यांवर काय कार्यवाही होणार? असा संतप्त सवाल भाजपचे ज्येष्टनेते एकनाथ खडसे यांनी सरकारला विचारला. सरकारला घरचा आहेर देत एकनाथ खडसे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायावरही भाष्य केले. 

एकनाथ खडसे म्हणाले, " माझ्यावर अनेक आरोप झाले ज्याचं तथ्यं शून्य आहे. दोशी असेल तर त्याला फाशी द्या. पण बेछूट आरोप झाल्यानंतर चौकशी पुर्ण झाल्यानंतर आरोप करणारांवर काय कार्यवाही केली गेली हे सांगावे. माझ्यावर राजकिय उद्देशाने तथ्यहिन आरोप केले गेले. सगळ्या आरोपांची चौकशी झाली. त्यात काहीच निघालं नाही. माझ्यावर लागोपाठ चौकश्या झाल्या आहेत. एका आरोपात तथ्य निघालं नाही. ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यावर काय कार्यवाही केली? तथ्य आढळले नसेल ते आरोप करणाऱ्यांवर काय कार्यवाही होते ? अशा सवाल विचार एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरले.

एकनाथ खडसेंच्या विचारलेल्या प्रश्नावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, हे खरायं की राजकीय हेतून आरोप केले जातात. मात्र, खोट्या तक्रारीला लाँजिकल एन्ड काय हे गटनेत्यांच्या बैठकित ठरवू. सगळ्या पक्षांच्या गटनेत्यांची एक बैठक आयोजित करून त्यात निर्णय घेण्यात येईल" 

दरम्यान, पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) तीन एकर जमिनीच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांचा कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्याशी संबध असल्याचे आरोपही करण्यात आले होते. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी पुर्ण करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live