पीएमपीला शिस्त लावण्याची आवश्यकता

पीएमपीला शिस्त लावण्याची आवश्यकता

कोथरूड : पुणे शहरात पीएमपी हे एकमेव सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. ही वाहतूक व्यवस्था सक्षम असायला हवी. परंतू ही व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. बस स्टॉपवर थांबतांना ती डावीकडे न थांबता रस्त्याच्या मधोमध थांबते त्यामुळे प्रवाशांना धावत जाऊन बस पकडावी लागते.या परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता असते. नादुरूस्त बस रस्त्यावर येतात. त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

बसचे वाहक प्रवाशांशी विशेषत:मुले व जेष्ठ नागरिकांशी अरेरावीने वागतात तरी त्यांना समज द्यावी. वाहकांकडे सुटे पैशे नसतात ते देण्याची व्यवस्था व्हावी. जेणेकरून प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागणार नाही बंद दरवाजाच्या बसची गरज असून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. वेळापत्रकाप्रमाणे बस वेळेत सुटतील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी व लोकाभिमुख करण्यासाठी पीएमपीएमएल या बाबींकडे लक्ष देतील काय? अशा अनेक असुविधांमध्ये सुधारणा झाल्यास पीएमपी नक्कीच लोकप्रिय होईल.

Web title: marati news public transport PMPML road discipline 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com