होळीसाठी झाडांना हात लावाल तर जेलमध्ये जाल..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

होळीसाठी जर कोणी झाडं तोडायला जात असेल तर त्यांना थेट तुरूंगात जावं लागणार आहे..कारण बेकायदा वृक्षतोड आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिलाय.. बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत जेलची शिक्षा होऊ शकते, तसंच पाच हजार रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. होळीसाठी सार्वजनिक रस्त्याच्या आजुबाजूची तसेच खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडे जाळण्यासाठी तोडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे तसेच अवैध वृक्षतोडीवर नजर ठेवण्यास सांगण्यात आलंय..

संबंधित बातम्या

Saam TV Live