12 मार्च 1993... मुंबईला हादरवणारा काळा शुक्रवार.. 

12 मार्च 1993... मुंबईला हादरवणारा काळा शुक्रवार.. 

मुंबईच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातला १२ मार्च १९९३ हा काळा दिवस. दहशतवादी हल्ल्यानं याच दिवशी मुंबई हादरली होती. अनेकांनी प्राण गमावले तर अनेकांचे प्राण, जीवाची पर्वा न करता काही शूरविरांनी वाचवले देखील. पण आपल्या कामाची योग्य दखल घेतली गेली नाही अशी खंत काही शूरवीरांना वाटतेय.

मुंबईवर १२ मार्च १९९३ ला झालेला हा दहशतवादी हल्ला.२५७ जणांचा बळी गेला तर ७०० हून जास्त जखमी.
बळी आणि जखमींचा आकडा अजून वाढला असता पण काही शूरविरांनी आपले प्राण पणाला लावत आरडीएक्सनं भरलेली स्फोटकं निकामी केली. लष्करातून निवृत्त मेजर वसंत जाधव हे असेच एक शूरवीर.दादर भागात स्कूटरमध्ये ठेवलेला १२ किलो आरडीएक्सला जोडलेला शक्तीशाली बॉम्ब जाधव यांनीच निकामी केला. स्कूटरच्या डिकीत ठेवलेला बॉम्ब निकामी करणं जोखमीचं होतं. पण हे अवघड काम त्यांनी कौशल्यानं पार पाडलं. सेंचुरी बाझार इथं झालेल्या स्फोटातही ते सापडले होते. पण तरीही ते मागे हटले नाहीत.१२ किलो आरडीएक्समध्ये ५००हून अधिक खिळे, लोखंडाचे टोकदार तुकडे मिसळण्यात आले होते. हा बॉम्ब फुटला असता  तर शेकडो लोकांचे प्राण गेले असते. माहिम कॉजवेजवळील फिशरमन कॉलनीत पेरलेला हँड ग्रेनेडही जाधव यांनी निकामी केला.लष्करातून निवृत्त झाल्यानंतर मुंबई विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेत त्यांची नेमणक झाली होती. पोलिसांच्या मदतीला धावून जात त्यांनी बॉम्ब निकामी केले. लोकांनी डोक्यावर घेतलं.कौतुकाचे फोनही आले. पण त्यापलीकडे जात आपल्या कामाची दखल घेतली गेली नाही अशी खंत जाधव यांना आहे,

 २८ वर्षानंतर आठवणीही धुसर होत चालल्यात. कधी तरी आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल अशी आशा निवृत्त मेजर वसंत जाधव बाळगून आहेत.


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com