सांगोल्यात लग्नाची वरात थेट पोलिस स्टेशनच्या दारात

भारत नागणे
रविवार, 25 एप्रिल 2021

सांगोला तालुक्यातील बंडगरवाडीत समोर आला. निमय मोडून विवाह सोहळयासाठी गर्दी जमवल्या प्रकरणी वधुवरांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. लग्नाच्या पहिल्याच दिवशी "लग्नाची वरात पोलिस स्टेशनच्या दारात'' अशी नव   दाम्पत्यांची स्थिती  झाली आहे

पंढरपूर :  कोरोनाचा Corona संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' Break The Chain अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत.  लग्न समारंभासाठी दोन तास वेळ आणि केवळ २५ लोकांना परवानगी दिलेली असताना ही ग्रामीण भागात नियम मोडून विवाह सोहळे Marriage धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. अशाच नियम मोडून विवाह सोहळे साजरे करणाऱ्या वधू वरासह त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. Marriage Part in Sangola Pandharpur Brought to Police Station For Corona Violation

असाच प्रकार आज सांगोला Sangola तालुक्यातील बंडगरवाडीत समोर आला. निमय मोडून विवाह सोहळयासाठी गर्दी जमवल्या प्रकरणी वधुवरांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. लग्नाच्या पहिल्याच दिवशी "लग्नाची वरात पोलिस स्टेशनच्या दारात'' अशी नव   दाम्पत्यांची स्थिती  झाली आहे.

सांगोला तालुक्यातील चिकमहूद अंतर्गत असलेल्या बंडगरवाडी येथे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लग्नकार्य सुरू असून या लग्नासाठी शेकडो वऱ्हाडी उपस्थित आहेत,अशी माहिती सांगोला पोलिसांना मिळाली.पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी Police बंडगरवाडी गाठली. शासनाने घालून दिलेल्या नियमापेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी उपस्थित असल्याने पोलिसांनी नवरा-नवरी सह  जवळच्या नातलगांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. Marriage Part in Sangola Pandharpur Brought to Police Station For Corona Violation

यामध्ये चिकमहूद येथील नवरदेव, त्याचे वडील, नवरदेवाची आई, कटफळ (ता.सांगोला)येथील नवरी मुलगी तिचे वडील, नवरीची आई यांच्यासह धनाजी महादेव अन्य काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live