मास्क वाढवतोय कोरोनाचा धोका

साम टीव्ही
शनिवार, 14 मार्च 2020
  • मास्क लावत असाल तरी होणार कोरोना.
  • चुकीचा मास्क वापरल्याने व चुकीच्या पध्दतीने हाताळल्याने कोरोनाचा धोका.
  • डॉक्‍टरच्या चिठ्ठी शिवाय मास्क देऊ नये असे निर्देश

 

मुंबई : अनेक लोक कोरोनापासून बचावासाठी मास्क लावून फिरत आहेत. 10, 20 रुपयाचे हे मास्क उपयुक्त नसून उलट जास्त धोकादायक आहेत. चुकीचा मास्क वापरल्याने व चुकीच्या पध्दतीने हाताळल्याने, लावण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे सुरक्षा निर्माण होण्यापेक्षा धोकाच जास्त आहे. नाकातोंडाजवळ कोरोना विषाणू वाढण्यासाठी योग्य असे दमट व ओले वातावरण तयार होते. रेग्युलर मास्कमधून कोरोना सहज आरपार जाऊ शकतो. फक्त एन-95 टाइपचे मास्क कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र ते फक्त रुग्ण व त्यावर उपचार करणारे डॉक्टर-नर्स ह्यांनीच वापरावे, जेणेकरून मास्कचा कृत्रिम तुटवडा होणार
नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. मास्कच्या बाहेरील भागावर विषाणू जमा झालेले असतात. त्या बाहेरील भागाला हात लागल्यावर तो हात डोळे, नाकाच्या संपर्कात आल्यास विषाणूचा फैलाव होऊ शकतो. कोरोनाच्या भितीमुळे मुंबईत मास्कचा वावर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे डॉक्‍टरच्या चिठ्ठी शिवाय मास्क देऊ नये असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, तरीही काळ्या बाजारात मास्कची विक्री सुरु आहे. त्याच बरोबर हे मास्क उघड्यावर टाकल्यास त्याला कोणाचा हात लागल्यास त्यालाही या विषाणूची बाधा होऊ शकते अशी शक्‍यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे शक्यतो मास्क लावणं ताळा.

 

हे ही पहा - VIDEO | कोरोनाच्या निमित्ताने कोण भरतंय स्वत:च्या तुंबड्या?

हे ही पहा - VIDEO | महाराष्ट्रात वाढले कोरोनाचे रुग्ण

Webtitle - Mask increases Corona Virus possibility


संबंधित बातम्या

Saam TV Live