रेमेडीसिवीर इंजेक्शनचा गैरवापर रोखण्यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टर प्लॅन

अभिजीत घोरमारे
सोमवार, 17 मे 2021

जिल्ह्यात रेमेडीसिवीच्या काळाबाजार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम हे ऍक्शन  मोड़ वर आले आहेत. असून रेमडेसिवर इंजेक्शनचा गैरवापर होण्यापासून वाचविन्यासाठी तसेच शासनाने दिलेले रेमेडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविन्यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी एक मास्टर प्लॅन योजला आहे.

भंडारा : जिल्ह्यात रेमेडीसिवीरचा Remdesivir काळाबाजार Black market  झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता भंडारा Bhandara जिल्हाधिकारी संदीप कदम  Sandip Kadam हे ऍक्शन मोड़ वर आले आहेत. रेमडेसिवर इंजेक्शनचा गैरवापर होण्यापासून रोखण्यासाठी तसेच शासनाने दिलेल्या रेमेडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविन्यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. इंजेक्शन कोणत्या कोविड Covid रुग्णाला दिले जाणार यासाठी संबधित डॉक्टरांना Doctors आता एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. शिवाय वापरलेली रिकामे बॉटल Vials सुद्धा वापस करत त्याचे ऑडिट Audit ही करावे लागणार आहे. Master Plan of Bhandara District Collectors to Prevent Remdesivir Injection Misuse

भंडारा जिल्ह्यात अतिगंभीर कोविड रुग्णावरच रेमेडीसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. यात शासनाकड़ून Government आलेले इंजेक्शन काही लोकांकडून कमी वेळात जास्त नफा कमविण्यासाठी जिल्ह्यात काळा बाजार सुरु झाला होता. एक इंजेक्शन 20 ते 25 हजारात विकले जात होते. त्यामुळे अतिगंभीर गरजु कोविड रुग्णांना त्याचा तुटवडा सहन करावा लागला. 

हे देखील पहा -

शिवाय जिल्ह्यात जे रॅकेट सापडले त्यात आरोपीचा रुग्णालयाच्या स्टाफमध्ये समावेश होता. त्यामुळे ह्या सर्वावर तोड़गा काढण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी यांनी नवीन शक्कल लढविली आहे. शासनाकड़ून जे रेमेडीसिवीर इंजेक्शन येते शिवाय जे खाजगी रुग्णालयातुन इंजेक्शन लावले जाते त्याचे आता ऑडिट सुरु केले आहे. Master Plan of Bhandara District Collectors to Prevent Remdesivir Injection Misuse

तसेच हे इंजेक्शन कोणत्या कोविड रुग्णाला दिले यासाठी संबधित डॉक्टरांकडून आता एक फार्म भरून घेतला जात आहे. त्यात खरच त्या रुग्णाला ह्या इंजेक्शनची गरज होती का ? याचा तपशील द्यावा लागत आहे. शिवाय वापरलेली  इंजेक्शनची रिकामी बॉटल ही वापस करावे लागत आहे. ह्या रिकाम्या बॉटलचे ऑडिट ही करावे लागत आहे. 

कित्ती ते सुंदर ! एकाच वेळी 2 इंद्रधनुष्याचे घडले मनमोहक दर्शन... 

प्रत्येक रुग्णालयात देखरेख ठेवण्यासाठी एका नोडल ऑफिसरची Nodal Officer सुद्धा नियुक्ति केली गेली आहे. ह्या नवीन नियमावलीमुळे नक्कीच रेमेडीसिवीरचा काळा बाजार ही रोखता येणार असून याचा रुग्णावर अनावश्यक वापर ही थांबता येणार आहे. 

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live