रतन टाटांकडून भारतीय हवाई दलाचे कौतुक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

मुंबई: टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी पाकिस्तानवर हवाई हल्ला करुन तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट करत कौतुक केले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बालाकोट येथे हवाई हल्ले करुन जैश-ए-महम्मदचे तळ उद्धवस्त केल्याबद्दल भारतीय हवाई दलाचा मला अभिमान आहे अशा शब्दात रतन टाटा यांनी देशाच्या हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. 

ते  ट्विटमध्ये म्हणाले की ‘पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला करून आपण ती उद्ध्वस्त केली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचे अभिनंदन. आपल्या देशात दहशतवादी नाही असे पाकिस्तानकडून वारंवार सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी (पुलवामा येथे) आपल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय हवाई दलाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.’ या ट्विटच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर हॅण्डलही टॅग केले आहे.

Web Title:Ratan Tata Hails IAF And PM Modi For Destroying Terrorist Training Camps That "Pak Claimed Never Existed", States His Pride

संबंधित बातम्या

Saam TV Live