माथेरानच्या मिनिट्रेनचा खासगीकरणाचा डाव

साम टीव्ही
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

माथेरानची मिनी ट्रेन खासगी करण्याचा डाव केंद्र सरकारनं आखलाय. खासगीकरण झाल्यास ट्रेनची सेवा पर्यटकाभिमूख होईल असं काही लोकांना वाटतंय.

माथेरानची मिनी ट्रेन खासगी करण्याचा डाव केंद्र सरकारनं आखलाय. खासगीकरण झाल्यास ट्रेनची सेवा पर्यटकाभिमूख होईल असं काही लोकांना वाटतंय. तर सामान्य माथेरानकरांनी रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध केलाय.

मुंबईसह संपूर्ण देशातील पर्य़टकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची मिनिट्रेनचं आता खासगीकरण करण्यात येणार आहे. माथेरानच्या मिनिट्रेनच्या खासगीकरणासाठी रेल्वेकडून पावलं उचलली जातायत. गेल्या काही वर्षांपासून नेरळ ते माथेरान या हा रेल्वे मार्ग बंद आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान ही शटल सर्व्हिस सुरू आहे तिलाही प्रचंड प्रतिसाद आहे. रेल्वे मार्गावर प्रवासी असतानाही हा रेल्वे मार्ग मुद्दाम तोट्यात दाखवून खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

 माथेरानच्या रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण होत असल्यानं माथेरानमध्ये पर्य़टक वाढतील असा आशावाद व्यक्त करत तिथल्या नगराध्यक्षांनी निर्णयाचं स्वागत केलंय.

 इतिहासाची साक्षीदार आणि ११४ वर्ष जुनी असलेली माथेरानची राणी आता खासगी होणार आहे. खासगीकरण झाल्यास सामान्यांच्या आवाक्यात माथेरानच्या राणीचा प्रवास राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जातेय. रेल्वे प्रशासन इतिहासाचा हा ठेवा जपण्यासाठी सक्षम नाही हेच या निमित्तानं अधोरेखित झालंय.

केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाबरोबरच अशाप्रकारचे एकूण चार मार्गांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशमधील कालका-शिमला ऐतिहासिक रेल्वे मार्ग, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी-दार्जिलिंग रेल्वे मार्ग, तामिळनाडूमधील नीलगिरी येथील रेल्वे मार्गांचेही खासगीकरण करण्यात येणार आहे. हे सर्व रेल्वे मार्ग आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मात्र आता मोदी सरकार हे सर्व रेल्वे मार्ग खासगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या तयारी आहे. दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या देखभालीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा तोटा रेल्वेला सहन करावा

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे खासगीकरण करून तिचा विकास करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने तयार केला आहे. सध्या तोट्यात असलेल्या या मार्गाचे खासगीकरण करून तो नव्याने बांधून घेण्याची

त्याचे दुपदरीकरण करण्याची आणि मार्गालगत काही नवी पर्यटन केंद्रे उभारून उत्पन्नाचे साधन तयार करण्याची ही योजना आहे. मार्ग तयार झाल्यावर रेल्वे फक्त त्याच्या देखभालीची जबाबदारी पार पाडेल. मात्र खासगीकरणातून रेल्वेला उत्पन्नाचा नवा मार्ग मिळेल.   नेरळ-माथेरानदरम्यान १९०७ मध्ये सुरू झालेली ही मिनी ट्रेन ११४ वर्षांची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाच्या फटक्यामुळे ती वारंवार बंद ठेवावी लागते आहे. सध्याही अमन लॉज ते माथेरानदरम्यान काही फेऱ्या होत आहेत. या रेल्वेमार्गाला प्रवाशांची पसंती असली, तरी पुरेशी देखभाल नसल्याने आणि मार्ग जुना झाल्याने वारंवार इंजिन, डबे घसरण्याच्या घटनाही घडल्या होत्या. आताही हा मार्ग सुरू करायचा असेल तर त्यासाठी गुंतवणूक करण्याची रेल्वेची तयारी नाही.

रेल्वेमार्गाबरोबरच हिमाचल प्रदेशमधील कालका-सिमला, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी-दार्जिलिंग, तामिळनाडूमधील नीलगिरी मार्गाचेही खासगीकरण करण्यात येणार आहे. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live