ऑक्टोबरमध्ये मुंबई लोकल सुरु करण्लायाला ग्रीन सिग्नल, "लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार"

साम टीव्ही
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरू झाल्या. कंपनी आणि कार्यालयांतही उपस्थिती वाढवण्यास मुभा दिलीय. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा बंद असल्याने, अन्य वाहतूक व्यवस्थेवर ताण येतोय.

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत हायकोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिलेत. राज्य सरकारने आता नियोजित पद्धतीने मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सुरू करावी. तसंच अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सेवांतील कर्मचाऱ्यांनाही त्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरू झाल्या. कंपनी आणि कार्यालयांतही उपस्थिती वाढवण्यास मुभा दिलीय. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा बंद असल्याने, अन्य वाहतूक व्यवस्थेवर ताण येतोय.

 त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत, कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढलाय. दरम्यान 5 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारला भूमिका मांडण्यास कोर्टाने सांगितलंय. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पुढील महिन्यात मुंबईतील लोकल सेवा आणि कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असं म्हंटलंय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिलेत. 

पाहा व्हिडिओ -

संबंधित बातम्या

Saam TV Live