माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यात झाली लाखो नागरिकांची तपासणी

अमोल कलये
शुक्रवार, 7 मे 2021

गृह भेटीतून "माझी रत्नागिरी माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाख ८६ हजार २५ जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या तपासणीतून १३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील ४४ जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी : गृह भेटीतून "माझी रत्नागिरी माझी जबाबदारी" Mazi Ratnagiri mazi jababdari या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात नागरिकांची आरोग्य तपासणी Health Checkup केली जात आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाख ८६ हजार २५ जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या तपासणीतून १३६ पॉझिटिव्ह Positive रुग्ण आढळले आहेत. यातील ४४ जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. In Mazi ratnagiri mazi jababdari campaign lakhs of citizens were checked in the district

हे देखील पहा -

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ७१० पथकांनी तपासनी कामाला सुरुवात केली होती. आता सध्या १३४८ पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत ८३ हजार २१९ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. यातून एकूण ९२ हजार ६७३ कुटुंबातील २ लाख ७५ हजार ५३६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. 

पुणे महापालिकेच्या अण्णासाहेब मगर जम्बो कोविड सेंटर मध्ये घुसले चोर !

या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर Oxymeter ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट Walk Test घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. ज्यांची पातळी चालण्याच्या तपासणीनंतर ९५ पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या २३७ इतकी आढळली आहे. तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या ४८९ इतकी होती. या तपासणी दरम्यान ११,३४७ घरे बंद असल्याचे आढळून आले आहे.

Edited By- Sanika Gade

 


संबंधित बातम्या

Saam TV Live