नागपुरातील MBBS चे इंटर्न्स डॉक्टर संपावर .... ( पहा व्हिडीओ )

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय या दोन वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे साडेतीनशे एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांनी संप पुकारला आहे.

नागपूर: राज्यात कोरोना Corona काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत आहे. कोरोनाकाळात मेडिकल स्टाफची गरज भासत असताना नागपुरातील इंटर्न डॉक्टर संपावर गेले आहेत. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय या दोन वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे साडेतीनशे एमबीबीएस इंटर्न MBBS intern डॉक्टरांनी संप पुकारला आहे. MBBS interns doctor strike in Nagpur

या इंटर्न डॉक्टरांनी कोरोना वॉर्डात काम करण्यास नकार दिला आहे. गेल्यावर्षी कोरोना काळात ज्याप्रमाणे मुंबई आणि पुण्यातील डॉक्टरला कामांसाठी वेगळे मानधन देण्यात आले होते, तसेच मानधन त्यांनाही देण्यात यावे. अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे. जोपर्यंत कामासाठी स्वतंत्र मानधन Honorarium देण्याचे प्रशासन मान्य करीत नाही तोपर्यंत इंटर डॉक्टर संपावर Strike राहणार आहेत.

पुनावाला तुम्ही पुण्याचे...महाराष्ट्राला झुकतं माप द्या...

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आज संपाचा इशारा दिला असून कार्यालयासमोर हे प्रदर्शन करणार आहेत. पुणे मुंबईप्रमाणेच आम्हाला एकूण 50 हजार मानधन मंजूर करावे अशी त्यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे तीनशे रुपये प्रति दिवस भत्ता द्यावा आणि इतरही ज्या मागण्या आहेत या मागण्यांसाठी हे सर्व विद्यार्थी संप पुकारला आहे. मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी संपाचे हत्यार उचलले आहे.  मात्र या संपाचा फटका एकूणच आरोग्य सेवेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live