Breaking वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या 

रामनाथ दवणे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत  येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

लातूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत  येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय Medical विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख Amit Deshmukh यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार आहेत. Medical Examinations in Maharashtra Postponed announcement by Amit Deshmukh

या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.या परीक्षा पुढे ढकलण्या  बाबत आपली  उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ११ एप्रीलला होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. ही परिक्षा पुन्हा केव्हा होणार, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. तसेच दहावी व बारावीच्या परिक्षाही राज्य सरकारने पुढे ढकलल्या आहेत. Medical Examinations in Maharashtra Postponed announcement by Amit Deshmukh

दहावीच्या परिक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परिक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. केंद्राने सीबीएसईच्या परिक्षाही पुढे ढकलली आहे. सीबीएसई दहावीच्या परिक्षा होणार नसून बारावीच्या परिक्षा जून मध्ये होणार आहेत. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live