मलेरियाचं औषधं कोरोनावर गुणकारी ठरत असल्याचा अमेरिकेचा दावा

नितीन सावंत
शुक्रवार, 20 मार्च 2020

अमेरिकेत आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा बाधितांची संख्यादेखील जास्त आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत जात आहे. त्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण आहे.

अमेरिका - अवघ्या जगाला चिंतेत लोटणाऱ्या कोरोना व्हायरसच्या आजारावर मलेरियाचं औषध प्रभावी ठरल्याचं अमेरिकेत दिसून आलंय..अमेरिकेत मलेरियाच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर गुणकारी ठरत असल्याचं दिसून आलंय, असा दावा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय..

कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 9 हजार जणांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मात्र अद्यापही कोरोनावर लस न सापडल्यानं लोकांमध्ये एक घबराट पसरली आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चर्चांना ऊत आला आहे. मलेरियावरील औषधाला अमेरिकेत कोरोनाच्या उपचारासाठी मंजुरीदेखील देण्यात आली आहे.

 

गेल्या 30 वर्षात 3 नवे वायरस आढळले. सार्स, मार्स आणि आत्ताचा कोविड-१९ म्हणजेच कोरोना. कोरोना या तिघांचं एकच जैविक कुटुंब आहे. दिसायला कोवीड-१९ हा सार्ससारखाच आहे. हा वायरस कुठून जन्माला आलाय, याचा सध्या शोध सुरु आहे. पण या वायरसचा उगम वटवाघुळांपासून झाल्याचा संशय आहे. कोरोना वायरसपासून बचावासाठी अजूनतरी कोणतंही ठोस औषध सापडलेलं नाही आहे.

 

अमेरिकेत आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा बाधितांची संख्यादेखील जास्त आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत जात आहे. त्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण आहे.

 

 

 

WHO म्हणजेज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडूनही कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे.

TWEET - 

 

 

दरम्यान, भारतात सध्या कोरोना बाधितांची संख्या आता १९७ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळलेत.. महाराष्ट्रात 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, तर पंजाबमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. एकूण चार कोरोना बाधितांचा आतापर्यंत देशात मृत्यू झालाय. 

 

medicine on corona virus covid 19 research by us malaria marathi india international

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live