मुंबईत तिन्ही रेल्वेमार्गावर रविवारी दुरुस्ती-देखभाल

साम टिव्ही ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी Mumbai Local Train मार्गांवर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. १६) मेगाब्लॉक Mega Block घेण्यात येईल

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी Mumbai Local Train मार्गांवर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. १६) मेगाब्लॉक Mega Block घेण्यात येईल. या वेळी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे Central Railsay प्रशासनाने सांगितले आहे. Mega Block on  All three routs of Mumbai Suburban Railway 

हे देखिल पहा- 

ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक नसून रात्रकालीन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.

मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान
परिणाम : सीएसएमटी ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. परिणामी, या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील. अप मार्गावरील माटुंग्यानंतर आणि डाऊन मार्गावरील मुलुंडनंतर लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. Maintenance work on Alll three routs of Mumbai Railway 

म्युकरमायकोसिस उपचारांसाठी ठाण्याचे रुग्णालय सज्ज

हार्बर रेल्वे
कुठे : कुर्ला- वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान
परिणाम : सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर/ वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक दरम्यान बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला, वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. Mega Block on  All three routs of Mumbai Suburban Railway 

पश्‍चिम रेल्वे
कुठे : भाईंदर ते वसई रोड दरम्यान अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवार-रविवारच्या मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत
परिणाम : या ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरील काही धीम्या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live