मेहुल चोक्सी अखेर सापडला; लवकरच भारतात आणणार

mehul choksi
mehul choksi

नवी दिल्ली : पंजाब Panjab नॅशनल National बँकेच्या Bank १४००० कोटी रुपयांच्या घोटाळा Scam प्रकरणात फरारी असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी Mehul Choksi याला डाॅमिनिकामध्ये ताब्यात Arrested घेण्यात आले आहे. त्याला भारताच्या India ताब्यात दिले जाईल, असे अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी सांगितले आहे. Mehul Choksi Finally Found; Will Be Bringing To India soon

हे देखील पहा -

चोक्सी २०१८ मध्ये देश सोडून फरारी झाला होता. ६२ वर्षांचा चोक्सी क्यूबाला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आले. अँटिग्वा आणि बारबुडा येथून चोक्सी गेल्या आठवड्यापासून गायब होता. तो येथे असल्याचे समजल्यानंतर सीबीआयनं त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु केली होती. त्यानंतर तो गायब झाला होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोक्सी डाॅमिनिका या छोट्याशा राष्ट्रात बोटीद्वारे पोहोचला होता. त्याच्या विरोधात लुकआऊट नोटिस काढण्यात आली होती. त्या अनुषंगाने  स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले आहे. Mehul Choksi Finally Found; Will Be Bringing To India soon

सध्या तो त्यांच्या कस्टडीत आहे. त्याला अँटिग्वाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याच्या पळून जाण्याने आपली बाजू भक्कम झाली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सोपी जाईल, असा विश्वास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com