धक्कादायक!! कोरोनाबाधित महिलेवर मांत्रिकाकडून उपचार,महिलेचा मृत्यू

Corona Patient died in Black Magic at Melghat
Corona Patient died in Black Magic at Melghat

धारणी मेळघाट : कोरोना Corona बाधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी मांत्रिकाकडे Black Magic गेल्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक तसेच दुर्दैवी प्रकार मेळघाटात Melghat उघड झाला आहे. कोरोनाबाबत प्रशासनाकडून प्रत्येक स्तरावर वारंवार सूचना आणि माहिती देण्यात येत असूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. Corona Patient Women died in Balck Magic at Melghat

सदर ४५ वर्षीय महिलेला सर्दी,खोकला अशा प्रकारची प्राथमिक लक्षणे असल्याने सेमाडोह येथील आरोग्य केंद्रात तिची अँटीजेन कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱयांनी सदर महिलेच्या  माहिती दिली तसेच महिलेला पुढील उपचारासाठी Treatment रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. मात्र महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले तसेच महिलेला साधा सर्दी, खोकला असून तिला कोरोना झाला नसल्याचे सांगितले व डॉक्टरांशीच वाद घातला,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमाले यांनी दिली आहे.

नातेवाईकांनी महिलेला उपचारांसाठी मांत्रिकाकडे Black Magic नेल्यानंतर तिच्यावर घरगुती उपचार करण्यात आले. मात्र त्यादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना मिळताच एका पथक महिलेच्या घरी पाठविण्यात आले. मात्र तिच्या नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याचं डॉ. रणमाले यांनी सांगितलं. बऱ्याच प्रयत्नानंतर सदर महिलेवर गुरुवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे.एकीकडे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा नागरिकांना कोरोना विषयी वारंवार माहिती देत असून काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. कुठलीही लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 

मात्र मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात जनजागृतीचे प्रमाण अत्यन्त कमी असल्याचे या दुर्दैवी घटनेवरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देखील मेळघाटामध्ये नवजात बालकांना आजारातून बरे करण्यासाठी भुमका/मांत्रिकाकडून डंभा दिल्या असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. वेळोवेळी प्रशासन याबाबत नागरिकांना सूचना आणि आवाहन करीत असते, मात्र मेळघाटातील आरोग्याच्या बाबतील अंधश्रद्धा कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. Corona Patient Women died in Balck Magic at Melghat

आरोग्यविषयक प्रबोधन आवश्यक

मेळघाटमध्ये घडलेली ही घटना अंधश्रद्धेचा प्रकार असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरोग्य यंत्रणेकडून मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य विषयक प्रबोधनाची आवश्यकता आहे. त्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रशासनासोबत आहे - हरीश केदार, जिल्हा सचिव,अनिस.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com