एकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता मंदावली! काय आहे यामागचं कारण वाचा...

साम टीव्ही
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कोरोना झाल्यानंतर महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात अधिक अँटीबॉडीज तयार होत असल्याचं समोर आलंय.

कोरोना रुग्णांच्या अभ्यासानंतर महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे एकदा कोरोना झालेल्या पुरूषांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता मंदावलीय.

कोरोना झाल्यानंतर महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात अधिक अँटीबॉडीज तयार होत असल्याचं समोर आलंय.  युरोपियन जर्नल ऑफ इम्युनोलॉजीच्या अभ्यास अहवालानुसार, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीच तब्बल सात महिन्यांच्या कालावधीपर्यंत शरीरात राहत असल्याचंही आढळून आलंय. 

हेही वाचा -

 

चांगली बातमी | देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावतोय! वाचा ही सविस्तर माहिती

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कोरोनाच्या विषाणूंविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीजची निर्मिती करते. संसर्गाच्या तीन आठवड्यांनंतर लक्षणांची तीव्रता कमी होऊन अँटीबॉडीज वाढू लागतात. तसंच, पुरुषांच्या शरीरात महिलांच्या तुलनेत अधिक अँटीबॉडीज दिसून आल्या आहेत. त्याचप्रमाणे अँटीबॉडीजच्या निर्मितीसाठी वयाचं बंधन नसल्याचा निष्कर्षही अहवालात मांडण्यात आलाय. 

जागतिक स्तरावर विचार केल्यास ९० टक्के रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीजचा कालावधी मोठा असल्याचं दिसून आलंय. शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याने भविष्यात पुन्हा या रुग्णावर कोरोनाच्या विषाणूंचा हल्ला झाल्यास शरिरात अगोदरच विषाणूला प्रतिकार करणारी यंत्रणा तयार झालेली असल्याने पुन्हा कोरोनाची लागण होत नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live